इये मराठीचिये नगरी

पोट भराया लढतो आहे
रोज नव्याने मरतो आहे


मोल श्रमाचे उरले नाही
अब्रु विकाया शिकतो आहे


बंद पडू दे गिरणी दोस्ता
उंच मनोरा बनतो आहे


गाव न माझे उरले आता
चाळ रिकामी करतो आहे


बघ उपरा ह्या शहरामाजी
ऐट मला दाखवतो आहे


पेट न घेई मन आताशा
षंढ जसा मी जगतो आहे


का शिवबा ह्या तुझिया राज्यी 
बोल मराठी दबतो आहे