शेअर बाजार

नमस्कार,


मी गेले काही दिवस शेअर बाजाराबद्दल वाचत आहे. मनोगतावरील या विषयाचे लेख खरंच माहिती देणारे आहेत. आणि तात्यांनी नवा बाजार सुद्धा सुरू केला आहे म्हणे! येथील लेख आणि सकाळ - लोकसत्ताच्या सोमवारच्या पुरवण्या आदी वाचत असतो. पण तरीही अद्याप खूप काही माहीत नाही .


शेअर बाजाराचा अभ्यास करण्यास उपयोगी होईल असा कप्पा - कट्टा, अशी लेखमाला - चर्चा आपण येथे सुरू करू शकतो का? ही चर्चा एका नियोजित आराखड्यात ही लेख माला पुढे जावी. आणि सर्वांनी मिळून त्यात सहभाग द्यावा. कारण विषय मुळात खूप मोठा, सतत बदलता आणि मराठी (माझ्यासारख्या ) लोकांना पूर्णपणे अज्ञात आहे. त्यामुळे सर्वांचा सहभाग अपेक्षीत आहे.


यात बाजारात वापरल्या जाणाऱ्या संज्ञांचा मराठीत अर्थबोध करून द्यावा ही विनंती.


नीलकांत