रुढींची मान्यता होती तिच्या माझ्या विवाहाला

रुढींची मान्यता होती तिच्या माझ्या विवाहाला
(म्हणूनच शांतता होती तिच्या माझ्या विवाहाला)


चला आले वऱ्हाडी वाजणारे गाजणारे हे
पुरेशी भव्यता होती तिच्या माझ्या विवाहाला


वराचा पक्ष हा वरती वधूचा पक्ष तो खाली
न दुसरी शक्यता होती तिच्या माझ्या विवाहाला


जणू मी मंगळावरचा जणू शुक्रावरीची ती
कशी एकात्मता होती तिच्या माझ्या विवाहाला!


खुल्या ह्या मंडपामध्ये ढगांची दाटली गर्दी
सरींची अक्षता होती तिच्या माझ्या विवाहाला



- माफी