गणिती कोडे

नमस्कार बाबांनू...


एक छानसे कोडे देत आहे.


पाच माणसे असतात. आपण त्यांची नावे अशी धरूः (केवळ मजेसाठी मनोगतींची नावे घेतली आहेत.. राग नसावा)


१. टग्या    २. वात्रट  ३. चंदुरबंड्या  ४. प्रियाली   ५. साती.


हे सगळे एक सहलीवरून परतत असतात. त्यांना वाटेत एक पुल लागतो. तो पुल पार करायला खालील अटी आहेत.


१. त्या पुलावरून एकावेळी २ जण जाऊ शकतात.


२. तो पुल पार करताना एक जळता कंदिल बरोबर घ्यावा लागतो.


३. तो कंदील फक्त ३० सेकंद जळेल.


४. प्रत्येकाचा पुल ओलांडण्याचा वेळ असाः(सेकंदामध्ये)


टग्या-१    वात्रट-३  चंदुरबंड्या-६  प्रियाली-८   साती-१२


५. पुल ओलांडताना ज्याचा वेग कमी आहे त्या वेगाने दोघे चालतील. म्हणजे जर टग्या आणि चंदुरबंड्या जात असतील तर दोघांना पुल ओलांडताना ६ सेकंद लागतील.


६. ३० सेकंदामधे सगळे पार झाले पाहिजेत.


तर मनोगतींनो खाजवा डोकं ः)


क्रुपया उत्तर व्य. नि. वर पाठवावे.


मी उत्तर ४ दिवसांनी जाहिर करीन.