कोरफ़ड पाक

  • मोठया(जाड) कोरफ़डीचे एक पान
  • मध ४ चमचे
  • काजु आणि इतर सुका मेवा २ चमचे
  • वेलदोडे २
  • जायफ़ळ चिमुट्भर
  • केशर ४-५ काड्या
१५ मिनिटे

कोरफडीच्या पानाला चाकूने उभा काप देणे,जेणेकरून दोन भाग होतील.

मधील गराला चाकूने २-२ बोटाच्या अंतराने आडवे काप देणे. चमच्याने गर सालींपासून अलगद वेगळे करुन मोठ्या वाटीत काढणे. त्यात वरील इतर साहित्य टाकून मिसळणे. वाटीत खायला देणे.जेली सारखा हा पाक चवीला छान लागतो.

 

कोरफडीत अ जीवनसत्व भरपूर असते.यकृतासाठी,पोटदुखीसाठी,सांधेदुखीसाठी गुणकारी असते. असा आरोग्यवर्धक पाक चवीसपण चांगला लागतो.

 

सौ. सासुबाई