स्पेलिंग बी

काल रात्री शालेय विद्यार्थ्यांची अमेरिकेत स्पेलिंग बी ची (स्पेलिंग स्पर्धा) अंतीम फेरी होती. हे भारतातही प्रक्षेपित होते का?


ह्यातल्या काही गंमती.
१. शेवटच्या राउंडला तिन्ही मुली होत्या.
२. भारतीय वंशाचे दोन चार मुले मुली शेवटच्या १३ जणांच्या गटात होते पण भारतीय वंशाचा चौथ्या क्रमांकावरच राहिला.
३. शब्द अर्थातच अत्यंत जड, कधीही न वाचलेले वा ऐकलेले होते. पण...
४. शेवटच्या काही राउंडमधे काही देशी शब्द विचारले. उदा. इज्जत. हा शब्द इंग्रजीत शिरला आहे हे माहीत नव्हते. विजेतीला शेवटून दुसरा शब्द चक्क कुंडलिनी हा होता. म्हणजे योग, अध्यात्माशी संबंधित. हाही शब्द इंग्रजीने घेतला आहे हे माहीत नव्हते.
५. एका स्पर्धक (तेलगू भाषिक) मुलाची आई चक्क साडी नेसून आली होती.  हे पाहून बरे वाटले. कॅमेरा स्पर्धकांच्या पालकांवरही रोखला जात होता. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपायला.

एकंदर शब्द बघितल्यावर असे वाटते की ह्या स्पर्धेच्या तयारीकरता इंग्रजीखेरीज ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन, संस्कृत ह्या सगळ्या भाषांची तोंडओळख करुन घ्यावी लागत असेल.



ही अमेरिकेत अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. मराठीत अशी काही स्पर्धा घेता येईल का?