एक अडचण..

मला मनोगतवर टंकलेखन करताना एक अडचण येतेय. मी लिहिताना मधूनच इंग्रजी अक्षरे उमटण्यास सुरवात होते. त्यामुळे मग मी 'लिहिण्याची पद्धत' हि रोमन करतो आणि परत देवनागरी करतो. त्यानंतर मराठी अक्षरे उमटतात. पण २-३ वाक्यांनंतर परत तेच चालू होते. तसेच अवतरण चिन्हे, स्वल्पविराम इ. चा वापर केला तर त्यानंतर येणारे अक्षर इंग्रजी येते.


कोणी मदत करू शकेल काय? तसेच प्रशासकांचा व्यक्तिगत निरोपाचा पत्ता काय?