हे बंध रेशमाचे

मनोगतावर नवीन आहे. आणि कविता करणेहि नवीन (१-२ महिने).आपण दिगज्जांनी सांभाळून घ्यावे. improvement साठि सुचना स्वागतार्ह.
हि माझी पहिली कविता आहे.


हे बंध रेशमाचे


स्मरते हुरहूर ती , चाहूल प्रथम प्रीतीची
न जाणे जुळले कधी , हे बंध रेशमाचे


गुंतता अलगद मने , पडली गाठ जन्माची
सुटता सुटे ना ऐसे , हे बंध रेशमाचे


विहरत्या पाखरांना , छाया जशी तरुची
देती तसा विसावा , हे बंध रेशमाचे


भंगले अचानक सूर , दृष्ट लागली कुणाची
आज तुटल्या तारा जणु , हे बंध रेशमाचे


उरला फक्त दुरावा , लोपली ओढ भेटिची
निःशब्द करोनी गेले, हे बंध रेशमाचे


आठवता प्रेमगाथा , कळ येते वेदनेची
जाहले बोचरे कैसे , हे बंध रेशमाचे


कळेल तुजला कधी, हि आग अंतरिची
दाहक असो तरिहि , हे बंध रेशमाचे