गुरूदत्त!

अभिनेते, दिग्दर्शक श्री गुरूदत्त हे हिंदी चित्रपटसृष्टीतील आमचे अत्यंत आवडते व्यक्तिमत्त्व. आम्ही त्यांचे निस्सीम भक्त आहोत. पण आमच्या मते हा एक 'शापित यक्ष' होता. आणि शेवटपर्यंत हा शापित यक्ष "प्यासाच" राहिला. का बरे झाले असावे असे?


अभिनेत्री वहिदा रेहमान ही स्त्री त्यांच्या आयुष्यात आली आणि त्यांची प्रतिभा अधिकाधिक खुलत गेली. पण त्याचबरोबर त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र तेवढेच उध्वस्त होत गेले असेही जाणकार सांगतात.


कुणाला याबाबतीत काही अधिक माहिती आहे का? त्यांच्या एकंदरीत चित्रपट कारकीर्दीबद्दल आपले मत काय? जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीचा विषय लोकांत चर्चीला जातो तेव्हा श्री गुरुदत्त यांचे नांव सहसा पटकन घेतले जात नाही असेही आमच्या पाहण्यात आले आहे. का बरं असे होत असावे?


इच्छुक मनोगतींकडून या विषयावर थोडीफार चर्चा अपेक्षित आहे.


संजोप राव, विनायक यांसारखे मनोगती गुरूदत्त-वहिदा प्रकरणावर अधिक प्रकाश टाकू शकतील असेही आम्हास वाटते. हिंदी चित्रपटसृष्टीचा त्यांचा अभ्यास आहे असा आमचा समज आहे. (तो गैरसमज असल्यास क्षमस्व!)


कळावे.


राजीव अनंत भिडे.