शैलेश खांडेकर - अभिनंदन

मंडळी, आपल्या मनोगतींपैकी एक श्री. शैलेश खांडेकर यांच्या विदग्ध या अनुदिनीला (ब्लॉगला) मराठीतील सर्वोत्कृष्ट अनुदिनीचा पुरस्कार नुकताचा भाषाइंडिया या मायक्रोसॉफ्टच्या उपक्रमाद्वारे जाहीर झाला आहे.


या बातमीचा दुवा येथे आहे.


शैलेशरावांचे हार्दिक अभिनंदन. मेघदूताच्या मराठी भाषांतरापासून ते पडद्याची झुंज या नाटकापर्यंत विविध लेखनप्रकार हाताळणाऱ्या, नवीन मराठी अनुदिनीकारांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या आणि संस्कृत साहित्य असो वा आधुनिक तंत्रज्ञान, त्यात जे जे आवडेल ते इतरांना सांगण्याचा उत्साह बाळगणाऱ्या त्यांच्या रसिकतेलाच हा पुरस्कार मिळाला आहे.