दु:खात साव आहे..!
दु:खात साव आहे,
चोरास भाव आहे!
जुल्मी प्रवाह आणि,
-पाण्यात नाव आहे!
तू भेटशील जेथे,
तेथेच छाव आहे!
झोपू सदाच आम्ही,
-तैसा ठराव आहे!
होइल भेट पुन्हा?
-स्वप्नात वाव आहे!
पुन्हा दुभंगलो मी!
-आता सराव आहे!
पक्षी उडून गेले!
-नि:स्तब्ध गाव आहे!
-मानस६