रूपास भाव आहे
ज्वानीत राव आहे,
रूपास भाव आहे!
जमला जमाव आहे,
मिळणार पाव आहे
होणार भेट पुन्हा
लक्षात नाव आहे
चोरून भेटण्याचा
झाला सराव आहे
बोलायचे तिनेच...
तैसा ठराव आहे
रस्त्यात डांबराचा,
आता अभाव आहे
दारे सताड उघडी
चोरास वाव आहे
कोठे अशी निघाली?
अफवास वाव आहे!
-कारकून
प्रेरणा- दुःखात साव आहे- मानस६