शीलास नाव आहे
रूपास भाव आहे
मंदास भाकरी अन्
कुंदास पाव आहे
मी लग्न काय केले
जमला जमाव आहे
फुकटात सर्व म्हणुनी
हीऽऽ खावखाव आहे
हे धैर्य उंदराचे
(ती म्यावम्याव आहे)
न्हाणीघरात माझ्या
शौर्यास वाव आहे
मीही कधी म्हणालो?
मी बाजिराव आहे
ती एक शेर आहे
मी एक पाव आहे
असली सुरात तरिही
ही कावकाव आहे