सोबत मी जीवनाची पुढे करीत चाललो!

सोबत मी जीवनाची पुढे करीत चाललो!


सोबत मी जीवनाची, पुढे करीत चाललो ।
हर काळजीस धुरात, मी मिळवित चाललो ॥ ध्रु ॥


मी शोक विनाशाचा, करणे होते व्यर्थची ।
मी मोद विनाशाचा, करीत व्यक्त चाललो ॥ १ ॥


जे लाभले हातात, त्यास नशीब मानले ।
ना लाभले, स्मृतीतुनी मी, त्यास मिटविले ॥ २ ॥


सुखदुःखभेद मुळी न, मला जाणवे जिथे ।
मी तिथे, मनास सतत, नेत चाललो ॥ ३ ॥


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०७१२


मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी
संगीतः जयदेव
गायकः रफी
चित्रपटः हम दोनो
भूमिकाः देवानंद, नंदा


मैं जिंदगी का साथ निभाता चला गया!