हलके

मित्रहो, अनेकदा अनेक गोष्टी वाचताना मला त्या बऱ्याचदा जडच जातात. एकंदरीतच स्वभावात गंभीरपणा नाही ( आणि त्यामुळे कुणी गंभीरणेही घेतही नाही, असो !). पण नाही जमत जड गोष्टी पचवणे. म्हणूनच या खालील रचनेची मध्यवर्ती कल्पना आहे ' हलकेपणा'


हलके-


या धावून आल्या कोण, सांग मला रे वाऱ्या


अरे ओळख ना रे तूच, या सावरीच्या म्हाताऱ्या


हे कोण खेळते येथे, सांग मला रे झाऱ्या


अरे ओळख ना रे तूच, तेलात खेळती पुऱ्या


हे कोण ऐकते येथे, हरपून अपुले भान


अरे ओळख ना रे तूच, हे तुझेच हलके कान


हलकी हलकी म्हणूनी,  कोणास बोलती आता


अरे ओळख ना रे तूच, ही तुझीच आहे कविता


हे कोण बोले हळुवार, हे कोणाचे रे गूज


अरे, " तू आहे थोडा येडा !" ही हलकीच रे कुजबूज


 


(सावरी- काटेसावरीचे झाड, याच्या बीया वाऱ्यावर उडतात )


विशेष सूचना - हलक्याची मध्यवर्ती कल्पना असलेली ही कविता मात्र अत्यंत समतोल ( बॅलन्सड ) आहे कारण या कवितेत एक गोष्ट 'जड' आणि एक गोष्ट  'हलकी' आहे. कवितेचा 'अर्थ' समजायला जड आहे आणि 'दर्जा' हलका आहे. आता तुम्ही काहीही म्हणा मी हलकेच घेणार ! हाsहाss हा !


                                              (लाईट हार्टेड ) अभिजित पापळकर