हे जग असेच असते

हे जग असेच असते


एखादा कळवळुन रड्ला तरी फ़िदिफ़िदि हसते


 


पोटातले दुख गालावर ओघळते


दुखाश्रु पाहुन आपलेच मन पाघळते...


 


कुणीतरी येतो आणि भावविश्व फ़ुलवतो


चिन्तानि काळवन्डलेल्या चेहरयावर गोड हसु खेळवतो


 


आपणहि त्या म्रुगजळामागे पळतो...बापुडे मनहि पळते


पण वेळ निघुन गेली की जीवनातिल वास्तव कळते...


 


ते कुणितरी आपल्याला आधीपेक्शाहि जास्त दुखावते


गोड वागण्याने हळुच छातीत खन्जीर खुपसते...


 


मग आपणच राहतो एकटे ...रक्त भळाभळा वाहते


हे जगहि आनन्दाने आपल्याला रडताना पाहते...


 


मग आपणही त्या जगाचा एक हिस्सा बनतो


आपलाही भुतकाळ जगासाठी एक किस्सा बनतो...


 


आपले भोळेभाबडे मन अतिरन्जिततेने नासते...


आणि मग आपले आपल्यालाच पटते कि...


 


हे जग असेच असते...दिसते तसे नसते...


तरिहि पुन्हा कुणीतरी मानगुटिवर येवुन बसते...


एखादा कळवळुन रडला की फ़िदिफ़िदी हसते...


 


भुमिका ठाकुर