दुभंगलेला खांदा


दुभंगलेला खांदा

शेंडी म्हणू कशाला मी माझिया शिखेला?
अभ्यास संस्कृताचा नाही उगाच केला!


आताच राधिका ती घुसळून ताक गेली
आताच चक्रपाणी लोणी लुटून गेला


मी  भेलकांडतोहे कळते कशास कोणा*!!&?
(प्रत्येक दोस्त होता आधीच झिंगलेला)


उडवून चिखल गेली शर्टावरी दुचाकी
(ओठांत जप शिव्यांचा ना व्यर्थ चाललेला)


त्या थोर थेरड्याला वायागरा म्हणाली,
"हा क्लैब्यधर्म सोडा ना अंगिकारलेला"


मारू नकोस असली मजला मगरमिठी तू
सांधायचा कुणी हा खांदा दुभंगलेला






टीकाराम


 


प्रेरणास्थान दुभंगलेला वाडा