भारतीय अभिजात/शास्त्रीय/पारंपरिक संगीताची संकेतस्थळे

भारतीय अभिजात/शास्त्रीय/पारंपरिक संगीत हा एक बहुमोल ठेवा आहे.


'मनोगत'चे अनेक सदस्य भारतीय अभिजात/शास्त्रीय/पारंपरिक संगीतातले जाणकार आहेत, अनेक दर्दी आहेत, काहीजण स्वतः गायन आणि वाद्य कलांचे विद्यार्थी आहेत, तर काही कलानिपुण आहेत, तर काही, कानाला चांगले वाटते म्हणून ऐकणारे आहेत, तसेच भारतीय अभिजात/शास्त्रीय/पारंपरिक संगीताबद्दल ज्ञानग्रहण करण्यास उत्सुक असलेले काही नवशिके विद्यार्थी सुद्धा आहेत. यातले काही भारतात तर काही परदेशात आहेत.


या सर्वांना रसास्वाद घेता यावा म्हणून या चर्चेद्वारे आपण महाजालावरचे भारतीय अभिजात/शास्त्रीय/पारंपरिक संगीताविषयीचे दुवे संकलित करूया. या दुव्यांचे स्थूलामानाने दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल


१. जिथे अशा संगीताबद्दल (निरूपण, माहिती) वाचता येईल.
२. जिथे असे संगीत ऐकता येईल.


तसेच दुवा देताना त्या संकेतस्थळावर वरील दोन्हीपैकी काय उपलब्ध आहे हे सांगितले तर या यादीच्या उपयुक्ततेत भर पडेल असे वाटते.


दिगम्भांच्या हिंदुस्तानी संगीत ५ - भातखंड्यांचे थाट या लेखावर झालेल्या चर्चेतून असे संकलन करण्याची कल्पना सुचली. त्या चर्चेत आलेले दुवे आणि मी नेहमी वापरत असलेला एक एकत्रितरीत्या खाली दिले आहेत.


  • आसावरी - इथे विविध राग आणि तालांबद्दल थोडक्यात, कोष्टकरूपात माहिती आहे. तसेच हिंदी चित्रपटातली गाणी आणि त्यात वापरलेले राग याबद्दलही काही माहिती उपलब्ध आहे.
  • सारंगी - इथे भारताच्या लाडक्या शेजारी देशातल्या ख्याल गायकांच्या आवाजात रागांचे संकलन आहे.
  • पॅट्रिक मूटाल - या फ्रेंच माणसाचा वैयक्तिक साठा आहे. इथे ध्वनी आणि ध्वनिचित्रमुद्रणसुद्धा उपलब्ध आहेत.

    खालील संकेतस्थळांवर ऐकता येईल-


  • हिंदुस्तानी शास्त्रीय गायन -

  • शास्त्रीय वादन

    महाजालाची व्याप्ती पाहता चारच्या कितीतरी पट संकेतस्थळे सापडणे अवघड नाही. पण प्रत्येकजण वेगवेगळी संकेतस्थळे वापरत असतो असे वाटते. या चर्चाविषयाद्वारे अशा संकेतस्थळांच्या दुव्यांचे संकलन होईल.


    ===


    'मनोगत'वर याआधी मराठी संकेतस्थळांचे संकलन करण्यात आले आहे.