कर्मठ हिंदुनी अस्पृस्यास दिलेले प्रमाणपत्र....२२/मार्च १९२८

भडोच जिल्ह्यातील अंकलेश्वर गावी महारवाड्यातील महाराना पाण्याचा फ़ार त्रास पडे.  पण त्याना सार्वजनिक पाणवठ्यावर कोणी जाऊ देईना. तेव्हा त्रासून जाऊन आणि मुसलमानांच्या फ़ुशीने उत्तेजित होऊन त्या महारांपैकी ३० जण मुसलमान झाले. तत्काल दुसऱ्या दिवशी कर्मठ हिंदुनी त्या महारांस मुसलमानी धर्माच्या सुंता नावाच्या संस्काराने ते शुद्ध झाले असल्याने त्यास 'स्पृश्य' झाल्याचे प्रमाणपत्र दिले.! इतकेच नव्हे ,


'बोले तैसा चाले' ह्या उच्च कर्मठ तत्वानुसार त्या मुसलमान होऊन शुद्ध झालेल्या महारांस त्याच पाणवठ्यावर त्याच दिवसापासून पाणी भरु देण्यास परवानगी दिली. जे महार त्या पाण्याच्या त्रासाने तळमळत असताही अजून मुसलमान झाले नाहीत ते अशुद्धच आहेत. त्याना पाण्यास शिवता येत नाही हे सांगणे नकोच. त्या मुसलमान झालेल्या महारांस शुद्ध झाल्याचे प्रमाणपत्र लेहून देऊन आणि त्यांच्याबरोबर पाणी भरुन  'बोले तैसा चाले' असें वागले.आमच्या वाचकांस म्हणुनच आमचा अनुरोध आहे की आपण सगळ्यानी प्रत्यही पहाटेस 'त्यांची वंदावी पाऊले' 


 


स्त्रोत - 'हाती आलेली चार प्रमाणपत्रे'\गरमागरम चिवडा\समग्र सावरकर