श्रद्धेचे बळ...







खालील लेख (म.टा.) वाचून आपल्याला काय वाटते?


श्रद्धेचे बळ?

[ Saturday, September 02, 2006 09:57:09 pm]





एकदा गणेशोत्सवात नवव्या दिवशी आमच्या घरी उंदीर आल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही तेव्हा अंधेरीत चौथ्या मजल्यावर राहात होतो. आरतीच्या वेळेस हा उंदीर आत-बाहेर करताना सगळ्यांनी पाहिला. तो गणेशमूतीर्, आरास, फळे-फुले यांना काही इजा करेल अशा भीतीने त्या उंदराला आम्ही 'रॅट किल' खायला घातले. दुसऱ्या दिवशी पाहिले तर त्याने ते औषध खाल्ले तर होते, पण तो गॅलरीच्या एका कोपऱ्यात शांत बसून डोळ्यांची उघडझाप करत होता. तो जिवंत होता. त्यामुळे चौथ्या मजल्यावरून त्याला फेकून देणे पटले नाही. त्याही दिवशी उंदीर त्याच जागेवर दिवसभर बसून होता. तिसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. माझ्या पतीना पोलिस बंदोबस्तासाठी जावे लागत असल्याने गणरायाचे विसर्जन आम्ही दुपारी एकच्या सुमारास करतो. त्या दिवशी आम्ही उंदराला मोदक खायला दिला. त्याची ती अवस्था पाहून आमचे मन हेलावले. त्याला विष घातल्याबद्दल आम्हाला अपराधी वाटायला लागले. घरच्या गणपतीचे विसर्जन करून आम्ही परत आलो आणि पाहतो तर उंदराचे प्राण गेले होते. जणू तो गणपतीविसर्जनासाठीच थांबला होता. ही घटना आम्हाला खूपच हेलावून गेली. आजही हा प्रसंग आठवला की डोळ्यात पाणी येते. श्रद्धेच्या जोरावर आपण मृत्यूलाही काही काळ रोखू शकतो काय? उंदीर हा गणपतीचा सेवक. त्याची श्रद्धा पाहून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.