शास्त्रीय संगीत : काही शंका

माझी भारतीय शास्त्रीय संगीताबद्दलची माहिती अगाध आहे. तरीही मी ते ऐकतो कारण
ऐकावंस वाटत, आवडत, भावत. अशा वेळी माझी अवस्था अजून वाचता न येणार्‍या
लहान मुलासारखी होते. गोष्टीच्या पुस्तकातली चित्रे आवडतात, चित्रांपलीकडेही काहीतरी आहे हे जाणवते पण नक्की काय ते कळत नाही.


परवा पं. जसराजांचा बैरागी भैरव ऐकत होतो. ऎकताना काही प्रश्न मनात आले. सुदैवाने मनोगतावर
शास्त्रीय संगीताचे जाणकार आहेत. माझ्या प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील अशी आशा करतो. शब्द असे होते. (चू. भू. द्या. घ्या.)
१. जगसो जाके लागे बिरानी
सोई करत मनमानी
कौन आए जियठानी


२. अब न मोझे समझाओ कान्हा तुम
कहे सुने की का रही अब
जाओ उतरी जाओ


३.हियसालत के मीठे बैना
बाली नवेली सोनक राते
बाको जाय सुनाओ


माझे प्रश्न असे.
१. यातल्या तिसर्‍या कडव्‍याचा अर्थ काय?
२. हे कुणी, कधी लिहिले? भाषा कोणती आहे?
३. याबाबत मायाजालावर काही माहिती उपलब्ध आहे का?
४. पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे मूलभूत धडे घेण्यासाठी तबकड्य़ांवर व्याख्याने उपलब्ध असतात.  अशी सोय भारतीय शास्त्रीय संगीताच्या बाबतीत आहे का?


हॆम्लेट