मुंबई महापालिका - हिंदीचे आक्रमण

लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेली आजची बातमी संक्षिप्त स्वरूपात पहा:


अशीच परिस्थिती उद्या मुंबईखेरीज इतर शहरांवर येऊ शकते.


 


मुंबईत मराठी माणसाचीच मस्ती चालणार, अशी गर्जना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी केली होती आणि मुंबईतील उत्तर भारतीयांनी मतपेटीतून या गर्जनेला नकारात्मक प्रतिसाद दिला होता. मुंबई महापालिका निवडणूक जवळ आलेली असताना आता काँग्रेसने पुन्हा भाषिक खेळी खेळली असून महापालिकेच्या कामकाजात मराठी इतकेच हिंदीला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.


मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे गटनेते राजहंस सिंह यांनी महापालिकेचे कामकाज मराठीबरोबरच हिंदीत चालविण्याबाबातची ठरावाची सूचना दाखल केली आहे.


मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी मुंबईत मराठी भाषेची गळचेपी होत असल्याची ओरड नेहमीच होत असते.


मुंबई महापालिकेच्या कारभारात आजवर प्रामुख्याने मराठीचाच वापर होत असला तरी भविष्यात महापालिकेच्या कामकाजात हिंदीचाही वापर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


महापालिकेच्या सप्टेंबर महिन्याच्या कार्यक्रमपत्रिकेवर ही ठरावाची सूचना घेण्यात आली आहे. राजहंस ह्यांची सूचना मान्य झाली तर मराठी व इंग्रजीबरोबर आता हिंदी भाषेतून कागदपत्रे देण्याचे काम वाढणार आहे.


खरेतर महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असल्याने महापालिकेच्या कामकाजात फक्त मराठीचाच वापर करण्याची गरज आहे. मुंबईत निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे आणि मराठीतून झालेले कामकाज समजले पाहिजे अशी अपेक्षा बाळगली तर ती चुकीची नाही.