सदाचार हा थोर सांडू नये तो

मिलिन्द भान्डारकर उर्फ वैद्य यांच्या सदाचार या प्रतिसादातून उद्धृत-



मनोगतावर नवीन येणाऱ्या सदस्यांना मनोगतावरच्या "सदाचाराचा" (best practices) एक लेख लिहावा. यात प्रतिसाद कसे मिळवावे वगैरे व्यंग उपेक्षित नाही, तर एकंदरीत सध्याचे मनोगताचे आस्वादवर्धक स्वरूप कायम ठेवण्यासाठी लेखन कसे करावे याविषयीचे मार्गदर्शन करावे. यात मला सुचणारे मुद्दे असे


१. आधी मनोगतावरच्या साहित्याचे भरपूर वाचन करावे.
२. लेखकांच्या चुका विनम्रपणे दाखवून द्याव्यात. आणि त्याविषयी चर्चा करण्यास तयार राहावे.
३. मनोगतावर कुठल्या प्रकारचे लिखाण होत नाही ह्याचा सखोल विचार करावा. आणि ती पोकळी आपल्याला कशी भरून काढता येईल ह्याचा विचार करून लेखन करावे.
४. आपल्या लेखनावर जे प्रतिसाद येतात त्यांचा आदर करून सौम्य शब्दात आपले म्हणणे पटवून द्यावे. टीकात्मक प्रतिसादांचा आणखीच गंभीरपणे विचार करावा.
५. आपण कुणाशी चर्चा करतोय ह्याचा त्यांच्या व्यक्तिरेखेवरून अंदाज घ्यावा. किंवा त्यांच्या आधीच्या लेखनावरून. त्यांना कळेल अशा भाषेतच लिहावे.


===


प्रशासकांच्या आपापसातसंबंधी पुस्तीतून उद्धृत-



कृपया कोणावरही टिप्पणी करताना व्यक्तिगत संदर्भ, रोख हे टाळावे.


  • टिप्पणी/टोमणे/शेलापागोटे हे लेखनावर असावे लेखकावर नव्हे.
  • कटुता, हिणकसपणा आणि अतिरेक हे टाळावे.
  • दुसऱ्याला आवडत नसेल आणि इच्छा नसेल तर सोडून देण्याची तयारी ठेवावी.
  • ह्यात भाग घ्यायचे आणि दुर्लक्ष करायचे तारतम्य सर्वांनी पाळावयाचे आहे.
  • नवीन विषय नवीन प्रतिसाद म्हणून तर त्यावरचे प्रतिसाद त्या त्या प्रतिसादाला प्रतिसाद म्हणून द्यावेत.

  • 'मनोगत'च्या नव्या/जुन्या सदस्यांना आणखी काही 'सुयोग्य' सदाचार सुचले तर ते या चर्चाप्रस्तावाच्या प्रतिसादांद्वारे मांडावे. यातून 'मनोगतवरील सदाचार' संकलित करता येतील असे वाटते.