(परीक्षा)

परीक्षेचे आले दिन,
प्रोफेसर छद्मी हासे,
"लावा दिवे एकदाचे!",
चंडिका माउली भासे !


असते खाटेवरती
पुस्तकांची त्या आरास,
उठणे कधी पाचाला,
कधी झोपणे चारास !


चहास उकळी येई,
पण दूध उतू जाई,
मारी कधी, मॅगी कधी,
कधी मिळते मिठाई


सारा पूर्ततेचा ऋतू
जर्नलेही झाली पुरी
लॅब साऱ्या तुडुंबल्या
काळ हासला आसुरी


वायवाच्या वेळी आला
नवीन प्रश्नांचा भरणा
दिवसा दिसले चांदणे
"अरे, जरा पाणी आणा"


प्रश्नपत्रिका ओतीव
सिलॅबसेतर प्रश्नांची
लपेटून जा उत्तरे
नको अपेक्षा मार्कांची


पाच, सात, आठ, बारा
येवो गुणांना भरती
डिस्टिंक्शनची किमया
होवो जगतावरती!


प्रेरणा: आश्विन आणि स्वानुभव