हस्ताक्षर आणि चित्रकला

माझा मुलगा ४थी त आहे. त्याचे हस्ताक्षर आणि चित्रकला चांगली आहे. तसेच तो चिकणमातीच्या वस्तू अतिशय सहजपणे करू शकतो. त्याला त्याच्या या कलेला वाव मिळावा म्हणून आम्ही जवळपास चौकशी केली पण अश्या प्रकारचे वर्ग कुठेही आढळले नाहीत. राज्य सरकारच्या एका कोर्स बद्दल मला जी माहीती मिळाली होती त्यानुसार वयाची १८ वर्षे पूर्ण व्हावी लागतात. सध्या तो ८ वर्षाचा आहे. तर त्याकरता मला मुंबईतील अश्या संस्थांची माहीती कोठे मिळू शकेल ?त्याची कलाकॄती तुम्ही इथे पाहू शकता.