हेमंत

श्री. वैभव जोशी ह्यांची 'वसंत' ही कविता वाचून मनांत आलेले लिहिले आहे,  विडंबन असले तरी विनोद नाही. त्यांच्याएवढे उत्तम आणि लयीत लिहिता आलेले नाही तस्मात्, समीक्षेचे, सुधारणा सुचविणाऱ्यांचे स्वागत. त्यांच्या वसंतात जिवंतपणा आहे, मी हेमंत आणि मृत्यूची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.


हेमंत


तो शुष्क कुडकुडत हसतो तेव्हा
विकार होतो रानी
जाती झाडे वाळुनि


ती झाडे हुडहुड हुडहुड करती
ऋतु बदलतो सारा
हेमंती गोठे पारा


हेमंत येतसे माझ्या गात्री
रेडा त्याचा साथी
ये निरोप घेण्यासाठी


घरघरतो माझा मंद श्वास
मी जगून घेते थोडे
क्षणभरात सुटते कोडे


की त्याच्यामुळे हिमचादर ही
अजून पांढरी आहे
ती वितळेल तोवरी म्हणावे
हाच हेमंत आहे


-वरदा