चला इतिहास लिहूया..(आपल्याला हवा तसा..)

पु. लंच्या एका लेखात असा उल्लेख आहे,"शेक्स्पिअरचं थडगं अमेरिकेत आहे, मी ह्या डोळ्यांनी पाहिले आहे..."असे अतिविशाल म.मंडळाच्या त्या बाई म्हणाल्या..(अचूक शब्द आठवत नाहीत,पण गोषवारा असा आहे.)
आम्हालाही अशा काही व्यक्ती भेटल्या ज्यांनी इतिहासाची ऐशीतैशी अगदी छातीठोकपणे 'बर्लिन' च्या भूमीवर केली..त्यातून ही भन्नाट कल्पना सुचली.



स्थल,काल कशाचेही बंधन न मानता असंबद्ध  असा  हा इतिहास लिहायचा आहे...केवळ एक गंमत हेच स्वरुप आहे.मी सुरुवात करते,सगळे मिळून हा इतिहास कुठे नेतात ,ते पाहू या..


हिटलर एकेक देश जिंकत,जिंकत भारतात आला,तिथे शिवाजीमहाराजांच्या "शूर आम्ही सरदार.."असलेल्या मावळ्यांशी त्याची लढाई झाली,घनघोर युद्धात कुणीच मागे हटेना..


पुढे...