वाचताना

ऐनवेळी झोक गेला वाचताना
चेहरा झोपाळलेला वाचताना


परीक्षेची वाटते भीती अताशा
सोडले मी धडे होते वाचताना


पाहुनी मज घेताना डुलकी, आई
"झोपणे टाळा" म्हणाली वाचताना


जो हवा तो शब्द होता गाळला मी
प्राण कंठाशी आलेला वाचताना


चारचौघींसारखीच बसले होते
फक्त होते बंद डोळे वाचताना


मी कुठे रडले निकालानंतरही?
चष्म्याने रे घात केला वाचताना


धोक्याची सूचना - वृतबद्धतेविषयी अडाणी असल्याने वृत्तात बदल, ओढाताण-आकुंचन झाले असण्याची शक्यता (खात्री?) आहे. तस्मात् सूचना-सुधारणांचे स्वागत.


आमची प्रेरणा - सारंग यांचे हासणे व सर्किटरावांचे नाचणे.