पाडतो कविता किती बकवास मी



पाडतो कविता किती बकवास मी
आणि म्हणतो मांडतो आरास मी

काढला सांगू कसा मधुमास मी?
विसरलो होतो घरी चष्म्यास मी

तळपते समशेर ही शब्दांतुनी
एक साधा  मारला ना डास मी

वेळ जो लागायचा, घेणार तो
मोकळा शोधू कुठे संडास मी?

मोहरीचे ओठ ते, फणकारले
सोडता लसणाळलेला श्वास मी

नाव टॉमीच्या पिलांचे माहिती
एवढा केला तुझा अभ्यास मी!

मी भुगोलाला तुझ्या भुललो जरी
वाचला आहे तुझा इतिहास मी!

आमच्या प्रेरणा:
१. वेदनांची मांडतो आरास मी
२.भासते त्यांना गुळाचा घास मी
३.राहिलो न अता कुणाचा दास मी
४.वाटतो आहे जरी बकवास मी