सूर लावतो आहे वारा... (गजल)


सूर लावतो आहे वारा
जुळवत बसतो मी तंबोरा...


माझ्याविषयी मी न बोलतो
स्वतःचाच का मज तिटकारा?...


लोक यशाच्या गोष्टी करती
(हरलेल्यांच्या मला विचारा)...


हा- हा म्हणता वाढत गेला
आवरू कसा अता पसारा?...


खोट्याची ही 'अजब'च दुनिया!
चंद्र खरा की हाही पारा?...