रोज खाऊनी मणामणात 'वेट' वाढले

आमची प्रेरणा अदिती यांची कविता आज माझिया कणाकणात कान जागले


रोज खाऊनी मणामणात 'वेट' वाढले
आणि पावलातले निघून त्राण चालले


आरशात मावणार प्रतिबिंब हे कसे?
आठवून हे मनात मीच हसू लागले


कैक बाकडी अशीच मोडली बसून मी
(नेहमीच शेकले शरीर फार मागले!)


रोज नाचते 'जिमे'त घाम गाळते परी
देह हा तसाच जाड ना जरा हि वाळले


आज शोधते तराजु मी मुळात वेगळा
दाखवेल जो कमी जनास 'वेट' चांगले


"केशवा"पुरे तुझे"वि.खे." दमात बोलले
लाज ना मला परी मुळी न 'पेन' थांबले


-केशवसुमार