आमचे प्रेरणास्थान - केशवराव काळ्य़ांच्या तीन कविता
कळत होते जावळ येताना
की हे केस क्षणिक आहेत
वळत नाही अजूनही
की हा गोटा क्षणिक नाही ।
तू म्हणालीस मी तुला कधी विसरणार नाही
मी म्हणालो "मी तुला कधी विसरणार नाही"
पूर्णसत्यच ठरले ते !
कारण त्यानुसार मी तुला विसरलोच नाही
आणि तू मला विसरलीस
(तू हे कुठे म्हणाली होतीस "मी तुला कधी विसरणार नाही" ?)
मनात माझ्या घटितच घडले
पुन्हा विडंबन स्फुरू लागले
कोण म्हणाले मनोगताला
"खोडसाळ' तुज सोडून गेले ?