लेखकांचे पाय कायम ओढणारा

आमची प्रेरणा माफी यांची गझल रूपकांच्या ओढण्यांना ओढणारी

लेखकांचे पाय कायम ओढणारा
टाचणी कविता-फुग्यांना लावणारा

मद्य, मदिरा, मद्यालयावर लिहिणारा 
वृत्तही केव्हा तरी सांभाळणारा

सख्त टीकेने कधी ना झोडणारा
पण जरा तिरकस स्तुतीने मारणारा

थंड रक्ताने विडंबन पाडणारा
वेळकाढू भांडणे ही लावणारा

राग येण्यासारखे हा वागणारा
'माफी'चेही भान "केशव" ठेवणारा

-केशवसुमार.