रकाने

आता जरा  गिळावे  मीही इथे सुखाने
का ती निघून गेली वाढून आत पाने?

बागेतल्या फुलांच्या दिसली गळ्यात पाटी
"फुलणार ना कुणाच्याही आज आर्जवाने"

ज्या अडगळीत गेलो तिथली घुशी म्हणाली
"ही घेतली पहा, जागा त्याच  उंदराने !"

झालीत बंद मजला बहुतेक सभ्य दारे
आता कुठे निघावे  मी चोर पावलाने?

माझ्याच दारवाना आलो न ओळखू मी
झालेत बंद त्याने माझेच छापखाने

होतो जरी निघालो शोधात बासरीच्या
(माझीच वाट  शोधावी का पण तबल्याने?)

"हा खेळ कारकूना आता जुनाच झाला"
ठेवून त्याच रेषा तू काढतो  रकाने

- कारकून

माझी प्रेरणा मिलिंद फणसे ह्यांची गझल 'दुकाने'