माझ्या संग्रहातील काही आर्या... भाग ४

१. रोज तुम्ही प्रभूपाशी पेढे बर्फी नवा खवा खावा/

     परी म्यां एके दिवशी रेवडीचा स्वाद का न चाखावा?

मोरोपंतांची ख्याती आर्यांसाठीच! असे सांगतात, की त्यांनी लिहलेली ही पहिली आर्या. ते सहसा देवालयात जात नसत. एकदा कोणी रेवडीकर  नावाचे कीर्तनकार आले होते, त्यांचे कीर्तन ऐकण्यास मोरोपंत गेले. नेहमी येणाऱ्यांनी 'आज इकडे कसे' असा प्रश्न केला असता मोरोपंतांनी म्हणे वरील उत्तर दिले. 

२. भू, जल तेज, समीर ख, रवी-शशी काष्ठादिकी असे भरला/

      स्थिरचर व्यापूनी अवघा तो जगदात्मा दशांगुले उरला/

३. ती शितोलोपचारी जागी झाली हळूच मग बोले/

    औषध न लगे मजला, परिसूनी माता बरे म्हणोनी डोले /

     (दमयंती आणि तिची आई यातील हा संवाद.)

४ न कळत पद अग्निवरी पडे, न करी दाह असे कधी ना घडे/

   अजित नाम वदता भलत्या मिषें, सकल पातक भस्म करितसे/

५. कृष्ण म्हणे मातेला, आम्ही जातो, अताची यमुनेला/

      काही तरी दे खायाला, लाडू अथवा हातात कान्हवला/