काय करू ? (भाग-२)

हॅलो स्वीटी...  

नेहमीप्रमाणे त्याने कॉल ची सुरुवात केला, आज तो गेले काही दिवस मनात आलेले सगळे विचार तिच्यासमोर मोकळे करणार होता.. खूप इच्छा होती की समोरासमोर जाऊन एखाद्या कॉफी शॉप मध्ये बसून अगदी हिंदी सिनेमात दाखवतात तसेच... हातात हात घेऊन काहीतरी सीरियस/रोमँटिक बॅकग्राउंड म्युझिक वर एकदम संथ वाऱ्याच्या लयीवर तिच्या चेहऱ्यावर येणारे केस मागे सारून एखादं गाणं गावं... आणि त्या गाण्यातच तिला सगळं उमजावं...   किंवा स्टिव-वंडेर च्याच चालीवर "आय जस्ट कॉलड... टू से... आय लव्ह यु... "म्हणत एकाच ओळीत मनातले भाव सांगावे...   पण छे.. हे असले प्रकार फक्त सिनेमा/अल्बम्स मध्येच ठीक असतात.. (नाही का?)

"बोला सर.. " तिचे उत्तर...

"काय गं? ४-५ दिवसांनी कॉल करूनही एवढा थंड रिस्पॉन्स?   ऑल वेल...? "

"नाही नथिंग इस वेल.. कटकट चालू आहे कॉलेज मध्ये, घरी सगळीकडेच... "

"ओह, कटकटीचा विषय ? "

"काही विषय लागत नाही... मिळेल त्या विषयावरून कटकट चालू होते....

"माझ्याबद्दल बोलतीयेस ? "

"हो... नाही म्हणजे... आय डोंट नो.. " 

"मी जर, इ थिंक आय एम फॉलिंग इन लव्ह विथ यु... असे म्हणालो तर ?"

"म्हणतोय्स की म्हणणार आहेस ? "

म्हणतोय गं स्विटी...पण हो नक्की काहीच माहीत नाहीये, फक्त वाटत आहे असं....

त्यानंतर त्यांच्यात काय चर्चा झाली माहीत नाही, पण त्याच दिवशी संध्याकाळी 'तो' आपल्या त्या सखी कडे जाउन आला, तिने विचारल्यावर तो म्हणाला, "बहुदा ताजमहाल फोटोतच जास्त छान दिसतो नाही ? " तिला कळले... तिने त्याला बसायला सांगितले - अवांतर गप्पा मारायची वेळ नव्हती...तिने विचारले - आर यू ओके ?... 

तो:येस पर्फेक्टली...  तुला तर माहीतच आहे... "जो भी प्यार सें मीला... हम उसी के हो लिये... "

--दॅटस द स्पिरिट.... चीअर अप.. मी कॉफी आणते,

तोः नको... कॉफी नको. मी सोडली!

-- का रे ? अचानक असे का म्हणालास ?

तोः नंतर सांगेन कधीतरी...

-- बरं, मग आता घरी जाणार ना ? काही वाटलं तर फोन कर.. आणि हो तुझ्या चेहऱ्याची ठेवण पाहता तो फक्त हसताना चांगला दिसतो बर का 

तोः नक्कीच !

तो घरी गेला-- नंतर अनेक दिवस आम्ही गप्पा मारत होतो पण "ती" विषयीच्या नाहीच.. ही इस अ स्पोर्ट'- आता तो बाकिच्यांना 'ताजमहालाचे उदाहरण देतो " ... पण कॉफी मात्र आज देखील घेत नाही...कारण ?...... फक्त एकच... 'ती' ला कॉफी ची ऐलर्जी होती...