काय करु ? (भाग ४ -- हा शेवट ?)

कॉफी शॉप मध्ये पाऊल पडता क्षणी "ती" दिसली.. . तिथेच बसलेली.. त्याच टेबल वर...! 

भूतकाळ हा पार्शलीटी करतो... वाईट दिवस चटकन विसरायला लावतो आणि चांगले दिवस मात्र आठवणीच्या गाठोड्यात कायम टवटवीत असतात... ह्यातलेच एक गाठोडे आज सोबत घेऊन आलो होतो भेटायला...सगळे गाठोडे रिकामे करून जायचे असे ठरवून... :D
~"अरे वा अगदी वेळेवर आलास ? आज गुलाब वगैरे घेउन ? "
"मागच्या वेळेस देखील, पण आज तूच लवकर आलीयेस..हा गुलाब.. तुझ्यासाठी... अशीच स्माईल करत रहा... न जाणो पुन्हा देऊ शकेन की नाही..  ..."
~"हो म्हटंल मागील वेळीसारखा उशीर नको, कॉफी सांगू की काही अजून काही ?...
"थांब.. कॉफी पेक्षा कडू बोलणार की गोड ते सांग मग त्याप्रमाणे ऑर्डर देऊ -- मिश्किल विनोदाने तिला डोळा मारून टेबल वर तिच्यासमोर बसलो."
ते काही असो, पण आज बोलणार नक्की  आहे... - "२ डेविल्झ ओन" !
ऑर्डर देताक्षणी मी म्हणालो -- "तुझ्या हिरोला बोललीयेस आपण भेटणार आहोत ते ? कदाचित त्याला आवडणार नाही.. "
"हो मी सांगून आलीये...
.. त्या दिवशी मी नंतर फोन केला नाही ह्याचे कारण म्हणजे तूच एकदा म्हणाला होतास की भावनेच्या भरातले निर्णय...त्या वेळी आपण दोघे एका वेगळ्या ट्रॅक वर चालत होतो ... कदाचित अनेक दिवस भेटायची जी ओढ होती त्यातून किंवा मग भेटल्यानंतर एकमेकांचे विचार/वागणे ओळखून....पण त्या क्षणी निर्णय घेणे अवघड होते...
-- मी तुला त्याक्षणी निर्णय विचारला नव्हता... मी तर..
-- एक मिनिट, प्लिज मला बोलू दे.. खूपं साठून राहिलंय.. ( तिच्या पाणीदार डोळ्यातल्या भावना ओळखून पुढे काही बोललो नाही... )
तू आधीपासून म्हणत होतास की प्रेमात पडू नको... मी नाही पडले.. 'आय केप्ट माय वर्ड' पण हा माझ्या आयुष्यात आला आणि नकळतच मी तुला त्याच्यात शोधत गेले... बहुदा काही साम्य होतं नव्हतं.. पण हो जेव्हा मी प्रेमात पडायचा विचार मनात आला तेव्हा तुझा कुठेतरी विचार झालेला होता.. पण..
असो, आपण भेटल्यावर मी त्याला भेटले.. आम्ही बोललो, खूप गप्पा मारल्या, आणि एकमेकांच्या प्रेमात देखील पडलो... अर्थात हे तुला डायरेक्ट सांगणे मला अवघड जात नाहीये कारण मला खात्री आहे तू समजून घेशील... (निदान मला इतर कोणाहून जास्त...!)
त्याला तुला फोन केलेला, भेटलेले आवडत नाही, त्याला थोडी इन-सिक्युअर फीलिंग असेल पण मी त्याला तसं कबूल केलं आहे...
" आज तुला भेटायला आले ते ह्याच साठी...
-- "ते मला त्याच दिवशी समजले जेव्हा तू परत फोन केला नाहीस... पण मग हे एवढं उशीरा का ?
" टाइम इस द बेस्ट सोल्युशन फॉर थिंग्स दोस आर डिफिकल्ट टू एक्प्रेस.. , मी स्वतः एवढी स्ट्राँग नव्हते की तुला नाही सांगू शकले असते, आणि हो तू समोर आलास की नकाराचे शब्द जिभेवरून कसे काय मागे फिरायचे माहीत नाही... तू माझा खूप छान मित्र होतास/आहेस म्हणजे, मी नेहमी तुझी कंपनी मिस करेन.. आणि हो तुझ्यासोबत राहून मला स्टेबल डिसीजन मेकिंग चा छोटासा कोर्स पण जमला बरं का !
" मग गुरुदक्षिणा म्हणून एकच कर -- लग्नाचं आमंत्रण नक्की दे... मी येईन असं नाही पण, निदान त्या तारखेला आणि तुझ्या वाढदिवसाला तरी वर्षभरातून फोन २ करू शकेन.. अर्थात आपण भेटलो तो दिवस देखिल... बाकी जसं तू तुझ्या हिरोला सांगितलसं-आय विल बी आऊट... ऑफ द पिक्चर ...!
अगदी आऊट नाही रे.. पण हो जेवढे क्लोज होते ते परत नाही जमणार कारण तुला माहीत आहे--
"नक्कीच... ऑल द बेस्ट टू यू.. अँड युवर फ्युचर.. "
एवढ्या गप्पांमध्ये कोल्ड कॉफी गरम झाली...आणि तशीही ह्या कॉफी ची चव लागत नव्हतीच... दोघांनी कॉफी एकमेकांच्या नजरेत पाहत संपवली, आणि अगदी पहिल्यांदा भेटल्याप्रमाणे एकमेकांना निरोप दिला, तो म्हणाला.. आयुष्यं खूप मोठं आहे कधी ना कधी कुठे ना कुठे नक्की भेटूच.. पण त्या आधी कधी गरज पडली तर कॉल कर...
तीः नक्की... ! 
आपण लहानपणी टेकडीवर किंवा सहलीला जाताना खूपं कुतूहलाने सुंदर दगड, वेगवेगळ्या आकाराचे शिंपले.. काही फुले, पाने  घेऊन पुढे जायचो. पण परतीच्या प्रवासात मात्र हातात एवढं सामान व्हायचं की हे सगळं कुठे ठेवायचं हा प्रश्न पडायचा... मग येता येता दिसेल त्या सुंदर वळणावर एक एक शिंपला..फुल ठेवून, घरी फक्त त्यांचे रंग लागलेले रुमाल आणू शकायचो..  
तसंच बहुदा... ह्या सुंदर वळणावर .. आजपर्यंत "त्याच्या" आयुष्यात आलेली सर्वांत सुंदर वस्तू त्याला सोडून पुढे जावं लागलं... तेही त्याच समाधानानं !  कदाचित पुढच्या टेकडीवर अजून सुंदर गोष्टी असतील.. आणि तोपर्यंत हे आठवणींचे गाठोडे रिकामे होईल आणि त्या गोष्टींसाठी जागा राहील ह्या अपेक्षेने...
परत येता येता त्याच्या  बाइक चे फायरिंग थोडे बदलल्या सारखे वाटत होते..... पण वेग मात्र कायम होता... .. !!
(क्रमशः)