मॅट्रिक्स- रसग्रहण ५

हे नक्की काय घडत आहे? आपल्या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार? हे प्रश्न मात्र निओसाठी अजूनही अनुत्तरितच आहेत.. त्याच्या कानात फक्त मॉर्फियसचा खर्जातला आवाज साठून राहिला आहे..

"शांत राहा सर्व उत्तरे एक एक करून येता आहेत! "

_______________________________________

मॅट्रिक्स मधून सुटका होउन निओ आता बाहेर आला असला तरी जन्मापासून शरीर रुपाने शेतामध्ये खितपत पडून राहील्याने त्याच्या शरीरातल्या स्नायूंचा वापर कधी झालाच नव्हता. काही तासांच्या किंवा दिवसांच्या नव्हे तर चक्क २५-३० वर्षांच्या गाढ झोपेतून उठवला गेला असल्याने त्याच्या स्नायूंना बळकटी आणण्याचे काम आता मॉर्फियसचा कंपू समोर आहे. शरीरात हजारो सुया टोचून प्रत्येक स्नायूला बळकटी आणली जात आहे... काही दिवसांच्या ह्या उपचारा नंतर अखेर मॉर्फियस निओला सगळे समजावून सांगण्याचा दिवस उजाडतो.. वयाची इतकी वर्षं आभासी दुनिये मध्ये राहिलेल्याला आणि सत्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक मेंदुमध्ये स्वप्न रुतलेल्या माणसाला.. समजावून सांगायचे तरी कसे? हे प्रभावीपणे सांगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला पुन्हा मॅट्रिक्स सदृश दुनियेत नेउनच समजावणे.  जाणे...

मॉर्फियसच्या कंपूने अनेक छोटे छोटे 'व्हर्चुअल रिऍलीटी प्रोग्रॅम्स' बानवले आहेत.‍.. जे मॅट्रिक्स च्या तुलनेत नगण्य असले तरी मॅट्रिक्स सारखेच थेट मेंदू मध्ये भरता येतात.. प्रत्यक्ष मॅट्रिक्स मध्ये घुसण्यापूर्वी आधी सराव करता यावा हा ह्या प्रोग्रॅम्सचा उद्देश. 'मॅट्रिक्स' हे शेवटी आभासी जग आहे त्यामूळेच तिथले सगळे नियम हे एकतर 'तोडता' येतात किंवा 'वाकवता' येतात हा इथला पहिला नियम आहे.... ह्या नियमाची प्रचिती येण्यासाठी ह्या प्रोग्रॅम्सचा वापर केला जातो.. त्यामध्ये मॅट्रिक्समध्ये घुसल्यावर कसे वागायचे? एखादा गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी दिसला तर त्याला कसे चकवयचे? प्रसंगी भौतिक शास्त्राच्या नियमांना कसे वाकवायचे? एखाद्या अधिकाऱ्याशी गाठ पडलीच तर त्याच्याशी कसा मुकाबला करायचा? अश्या अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

 अश्याच प्रोग्रॅम्स च्या मालिकेतला एक म्हणजे 'मॅट्रिक्स काय आहे?' हा प्रोग्रॅम. नव्याने एका अर्थाचे पुनर्जम्न घेणाऱ्यालाच मॅट्रिक्सची माहिती मिळावी ह्या साठी बनवलेला एक प्रोग्राम. मॉर्फियस स्वतः निओला ह्या कृत्रिम जगात घेऊन जातो.. पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर.. ...फक्त दोन व्यक्ती निओ आणि मॉर्फियस नुसती केश रचना आणि कपडे नव्हे तर आपले पुर्ण बदलेले रूप आणि आजुबाजुची सत्याचा हुबेहूब आभास करणारी पार्श्वभूमी पाहून निओ थक्क.. मॉर्फियसा धीर गंभीर आवाज ...

'वास्तव म्हणजे नेमके काय? वास्तवाचि व्याख्या काय?

--------------------------------------------------------------

मॅट्रिक्सचे रसग्रहण माझ्या दृष्टिने इथे संपते.. इथून पुढचा थरार.. ऑस्कर पदक विजेते स्पेशल इफेक्ट्स... अप्रतिम छायाचित्रण... ह्यांचा आस्वाद हा चित्रपट माध्यमातूनच घ्यावा.. त्यासाठी शब्द अपूरे आहेत.. पण ह्या रसग्रहणाला पुर्ण्विरा