आमची प्रेरणा प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी यांची अप्रतिम गझल भयंकर
मिसळी वर मज राग भयंकर...!
दुसऱ्या दिवशी आग भयंकर...!
तव स्पर्शाने घाबरले मी,
मला वाटला नाग भयंकर...!
काही केल्या लपला नाही..
सदऱ्यावरचा डाग भयंकर...!
बाप तिचा आलाच अचानक,
...नंतरचा तो भाग भयंकर...!
दूर वरुनी दरवळ आला,
सोन खताची बाग भयंकर...!
"केश्या"च्या ह्या विडंबनांवर..,
सर्व कवींना राग भयंकर...!
ई. केशवसुमार, मॅकल्सफिल्ड.