`मनोगत`चे संचालक, प्रशासक, कायमस्वरूपी सदस्य, धावती भेट देणारे पाहुणे-सदस्य....या सगळ्यांन तर्फे प्रदिपराव आपलं मनोगतावर स्वागत ..!
........................................................आपली सुरेख कविता ...पोरी वयात आल्या ! वाचून आम्हाला ही काही ओळी सुचल्या
(पोरी वयात आल्या...!)पोरी वयात आल्या, आल्या वयात पोरी !
फिरती घरावरूनी गल्लीतले टपोरी!होत्या कभिन्न काळ्या आता नटून आल्या
रंगात कोणत्या या रंगून आज आल्या
आल्या पहा बसुनी या नाभिका समोरी....!या चालतात तेव्हा न्याहाळतात सारे
या बोलतात तेव्हा पण तोडतात तारे
आहे जरी तयांची पाटी खुशाल कोरी !त्यांना सदाच वाटे सारे हवेहवेसे...
यांच्यामुळे कुठेही होई नकोनकोसे...
कंठात प्राण येतो, येताच या समोरी !बघ हासतोय नुसता ह्याला न लाज थोडी
"केश्या" विडंबनाची रे थोडक्यात गोडी
अवरून घे अता तू प्रतिभा तुझी छिचोरी !***
तू ही जपून थोडे खरडायला नको का ?
"केश्या" तुला तरी हे समजायला नको का ?
...मिळतो न न्याय येथे पसरून नको कटोरी !***
...पोरी वयात आल्या...आल्या वयात पोरी !
-केशवसुमार