विठ्ठलाची मुक्तता

जनाईला जात्यावर दळताना ,मदत केलीस तू

दामाजीसाठी म्लेंच्छ- दरबारी भरणा केलास तू

चिखलात तुडविलेले पोर जीवंत केलेस तू

रेड्यामुखी वेद वदविलेस  नि निर्जीव भींत चालविलीस तू

सावता माळ्याच्या शेतात,जीवन होवून वाहिलास तू

तुकारामाना तर सदेह वैकूंठात नेलेस तू

इतुके सारे न करता...

धान्याचे पीठ करणारे यंत्र दिले असतेस तर ,

म्लेंच्छांच्या राजवटीचा नाश केला असतास तर,

गोरोबा कुंभारांना स्वयंचलित मिक्सर दिला असतास तर,

सावतामाळ्याला स्वयंचलित शेतीअवजारे दिली असतीस तर,

लोकांचे अज्ञान दूर करून,षड्रिपू निर्दाळले असतेस तर,

आम्ही ही केली असती तुझी मुक्तता,

अठ्ठावीस युगांच्या ''वीटेवरी उभा राहा'' आदेशातून !