नायिका : | खुणासूचनांनी हृदय जिंकण्याची कला सांग ही सर्व शिकलास कोठे |
नायक : | कटाक्षाकटाक्षात जादू कराया सखे नेमके तूहि शिकलीस जेथे ।ध्रु। |
नायक : असे दोष माझाच का,
कि, भरलीस तू मन्मनी?
जिवाला छळू लागली
तुझी निर्दयी मोहिनी - तुझी निर्दयी मोहिनीकथा प्रेमवेड्या कुणा नायकाची१
व्यथेहून माझ्या असे भिन्न कोठे? ।१।नायिका : खुणासूचनांनी हृदय जिंकण्याची
कला सांग ही सर्व शिकलास कोठे
नायिका : | करी प्रेम जो जो कुणी उघड त्या करी ना कधी हृदयस्पंदने आपली कुणा ऐकवी ना कधी - कुणा ऐकवी ना कधी कुठे राहिली प्रेम करण्यात गोडी२ |
नायक : | कटाक्षाकटाक्षात जादू कराया सखे, नेमके सांग शिकलीस कोठे? |
नायक : मला मान्य, प्राणप्रिये,
दिसायास लाखात तू
जराशी परी दाद दे
पहाण्यास माझ्याहि तू - पहाण्यास माझ्याहि तूवसंतासही वाटले मोल ज्याचे
उपवनातुनी फूल मी वेचले ते ।३।नायिका : खुणासूचनांनी हृदय जिंकण्याची
कला सांग ही सर्व शिकलास कोठेनायक : सखे, नेमके तूहि शिकलीस जेथे
१. पाठभेद : कथा मजनु रांझा अशा नायकाची .. किंवा .. कथा मजनुची आणि रांझाकहाणी
२. पाठभेद : उरे प्रेमक्रीडेमधे काय गोडी किंवा उरे प्रेम करण्यामध्ये काय गोडी
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
लांब ओळी - लगागा लगागा लगागा लगागा
आखूड ओळी - लगागा लगागा लगा
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.
३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील )
४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)