गहिऱ्या रानावरती
काळोखाची साय।
रान पण तसंच- शांत निवांत।
चांदण्यांचा प्रकाश गोठलेला
वारा का अवचित निवांत झाला---
बेचैनीची अस्फुट खसखस
तीही आता उरली नाही।
अन् तृप्तीचा नाद ज़राही
कुठेसुद्धा किणकिणला नाही।
पाण्याचीही संथ विरक्ती
तरंग-जल का अभंग झाले।
काठावरल्या गर्द बनाचे
वसंतातले रंग उडाले।
विटक्या मळक्या एकांताचे
काटे मोठे ज़हरी झाले।