कान्हा गवळ्याकडे ४० लिटर दुधाच्या २ बरण्या आहेत आणि बाकी कुठलेच मापाचे भांडे नाही. त्याच्याकडे श्यामलाल आणि रामलाल दूध घ्यायला येतात. श्यामलालकडे ४ लिटरचे भांडे आहे आणि रामलालकडे ५ लिटरचे. दोघांनाही २ लिटर दूध हवे आहे. कान्हा गवळ्यालाही हे ४ लिटर दूध विकल्यावर एका बरणीत ४० आणि दुसऱ्या बरणीत ३६ लिटर दूध उरायला हवे आहे. श्यामलाल आणि रामलाल यांना दूधाचे माप अचूक असायला हवे आहे, अंदाजपंचे दाहोदरसे चालणार नाही. आता इतर कुठलेही भांडे न वापरता कान्हा गवळी दोघांना अचूकपणे २-२ लिटर दूध कसे देणार?