अप्सरा स्वर्गी किती आहेत बाकी ?
आत्मघाती खूपसे रांगेत बाकी!
ये मुजाहिद, हो शहिद अन् गाठ जन्नत
कापण्याला काफिरांचे शेत बाकी
मांडलिक राजेच नशिबी भारताच्या
देशद्रोह्यांचे असावे रेत बाकी
चार विकले, दोन फुटले, गणित चाले
खासदारांचा कळप पागेत बाकी
खंत का विझल्या जरी साऱ्या मशाली
काळजी कसली? चिता आहेत बाकी...
हात आखडता कशाला पाप करता
खूप पाणी आजही गंगेत बाकी
मेघ छप्पर, भिंत वारा, बाज पृथ्वी
हिंददेशी ना कुणी अनिकेत बाकी