आवृती

आमची प्रेरणा ... 'निवृती'

शेवटची ना आज घोषणा करतो आहे
टंकत असता हात जरा थरथरतो आहे

भुलवती मजला दोघी प्रतिभा आणि प्रतिमा
प्रतिमेवर का प्रेम परि मी करतो आहे

अभिजात लेखनाचा निश्चय होता मी केला
स्मरणाने त्या पुन्हा जरा कातरतो आहे

मित्रांनीही सावध केले होते मजला
पाय तरीही तिकडे का हा वळतो आहे

विडंबकाला वाहवाहवा करती सारे
कवी त्यामुळे कसा अंतरी जळतो आहे

चंद्रचांदण्या, सुखदुःखाच्या करेन कविता
खाष्ट सासरा, जुगार-मदिरा विस्मरतो आहे

उदासलो मी शुक्रवारच्या सायंकाळी
अर्धा प्याला रिताच मजला छळतो आहे

हाय मला पण नकाच गांभीर्याने घेऊ 
कुणास ठाऊक प्याला कितवा भरतो आहे