अलीकडे (म्हणजे काही महिन्यांच्या आधीपासून) कोथरूड येथे एक नामांकित व्यायामशाळा सुरू झाली आहे. हे ठिकाण कोथरूडच्या मध्यावर म्हटले तरी चालेल असे आहे. शिवाय कर्वे रस्ता आणि पौड रस्ता दोन्हीकडून तसे जवळही आहे. तसेच ह्या भागाच्या आसपास दोन/तीन बंगल्यांच्या सोसायटीज आहेत. त्यामुळे हा भाग तसा शांतच आहे. खूप उच्चभ्रू लोक ह्या व्यायामशाळेत येतात. पण व्यायामशाळेत गाड्या लावायची सोय नसल्याने बाहेरच रस्त्यावर सर्व लोक गाड्या लावतात. P1/P2 नसल्याने रस्त्याच्या दोन्ही कडेला अनेक चारचाकी तसेच काही प्रमाणात दुचाकी वाहनांची गर्दी असते. मला असे वाटते की ह्या व्यायामशाळेचा विस्तार इतका मोठा आहे की त्यांनी गाड्यांसाठी पार्किंगची सोय करायला काहीच हरकत नव्हती.
त्यामुळे ह्या भागातले प्रदूषण वाढले आहे. तसेच रस्त्यावर दोन्ही बाजूला गाड्या असल्याने आजूबाजूच्या बंगल्यांतील लोकांना स्वतः ची गाडी लावायला त्रास तर होतोच पण पुन्हा त्या लोकांकडे कधी पाहुणे आले तर त्यांच्या गाड्या लावायला जागा नाही. तर व्यायामशाळेत येणाऱ्या लोकांसाठी व्यायामशाळेतच पार्किंग उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे वाटत नाही का?(इतके पैसे हे लोक त्यांच्या मेंबर्स कडून घेतात की थोडे आणखी पैसे घेऊन व्यवस्थित पार्किंग तरी बांधावे असे मला वाटते. आणि हल्ली काही मॉल्स मध्येही पार्किंगची सोय केलेली असते. तशीच ह्या व्यायामशाळेने करून देणे गरजेचे होते. )
आता ते शक्य नाही म्हणून निदान ह्या रस्त्यावर पेड पार्किंगची सोय केल्यास पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर सुद्धा पडेल तसेच काही लोक मग कार पूलिंग करतील. त्यामुळे इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल.)