पुस्तके वाचून मित्र मिळविणे

आजकाल दुकानांमध्ये व्यक्तिमत्व विकासाबद्दलची, जीवनशैली 'सुधारण्याबाबतची', यश मिळविण्याबाबतची पुस्तके उपलब्ध असतात.
उदा. हाऊ टू इनफ्ल्युएन्स पीपल ऍंड विन फ्रेंडस ?
अशा प्रकारच्या पुस्तकांमुळे खरोखरीच फायदा होतो का ?
वरील विशिष्ट उदाहरण घेतल्यास -
पुस्तके वाचून मित्र मिळविता येतात का ?
मैत्री नकळत होऊन जाते. अनुभव असा की, दोन व्यक्तींचे सूर एकतर जुळतात किंवा जुळत नाहीत.  
पुस्तक वाचून मुद्दाम एखाद्या पध्दतीने मित्र मिळविणे कितपत शक्य ?
पध्दत वापरून मित्र मिळविल्यास ती मैत्री टिकेल का ?
सतत पध्दती वापरून जीवनात चालायला लागल्यास वागण्यातील सहजता निघून जाईल का ?
प्रत्यक्ष अनुभव काय आहेत ?