चिंटू

मंडळी,

आपल्यापैकी बरेच जण शाळेत असल्यापासून चिंटू वाचत मोठे झलो आहोत. वर्तमांपत्रातले बाकी काही वाचण्यात रूची नसलेल्या वयातही चिंटू मात्र दररोज न चुकता पाहत होतो. तर असा हा चिंटू अजूनही लहानच राहिला आहे. ..
जऽऽर.... चिंटूलाही आपल्या वयाबरोबर मोठे केले तर?
समजा की त्याला ही वीस वर्षानी पुढे नेले तर ? जरा विचार करून बघा..

चिंटू-मिनी आणि पप्पू-नेहा कॉलेज मध्ये जाऊ लागतील आणि तिथे ही प्रोफेसरांची मजा उडवतील ? एकमेकांचे लव्ह इंटरेस्ट होतील का मित्र मैत्रिणीच राहतील? समजा लव इंटरेस्ट झालेच तर फायनली चिंटू ला मिनीच्या कविता भावतील ?
त्याला मिनीच आवडायला लागेल? नेमके त्याच वेळी राजूला ही मिनी आवडायला लागली तर? पप्पू आपला नेहाशी सुत जमवू शकेल आणि बगळ्या मात्र सगळ्यांचा कॉमन भैय्याच राहून त्याच्या कुत्र्याला फिरायला नेताना जोशी काकूंकडे सुट्टी साठी आलेल्या त्यांच्या कुत्री फिरायला नेणार्या भाचीच्याच प्रेमात  पडेल? सतिश दादाला मुलगी पसंत पडून त्याचे लग्न होऊन या सर्व दोस्ताना एक छानशी वहिनी येईल??

चला तर मग .. लढवा आपापल्या कल्पना आणि रंगवा पाहू तरूण चिंटू ?