ही रचना लिहीतांना खरे तर गझलचे नियम पाळूनच लिहिली आहे. पण ती पूर्ण झाल्यावर ती एक संयत लावणी झाली आहे असे मला वाटते. मात्र अशा ढंगाच्या गझल म्हणून मा.प्रदीप निफाडकरांची 'स्वप्नमेणा' ही गझल किंवा अनिल पाटलांच्या 'गाफील' या गझलसंग्रहातील काही गझला माझ्या वाचनात आल्या आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने ही गझल आहे की नाही निर्णय तुमच्या हाती सोपवत आहे. जाणकार गझलकारांनी न्याय करावा. अन्यथा 'गझलावणी' नावाचा नवा काव्यप्रकार म्हणूया!
काल झाल्या ओळखी
आज दारी पालखी!
एक त्या भेटीत मी
काळजाला पारखी
नजर ती बाई अशी
याद येई सारखी
हिरकणी आहेच मी
तो ही खरा पारखी!
दूर ना मज राहवे
काय सांगू आणखी?
---------------------------------------
जयन्ता५२